ते गोरे साले रस्त्यामध्ये
थूंकू देत नव्हते
वेड्यासारखे रोज पाण्याने
रस्ते धूत होते.
आपण किती भाग्यवान
गुटका पान तंबाकू खाऊन
रस्त्यात कुठेही थूंकू शकतो.
छान झाले स्वातंत्र्य मिळाले
ते इंग्रज साले धान्यामध्ये
भेसळ करू देत नव्हते
मूर्खासारखे रेशनवर
सकस धान्य देत होते.
आपण किती पुण्यवान
दूध अन्न औषधामध्ये
बेमालूम भेसळ करू शकतो.
बेस्ट झाले स्वातंत्र्य मिळाले
ते ब्रिटीश साले शिक्षणाचा
धंदा करू देत नव्हते
अडाण्यासारखे दर्जेदार शिक्षण
फुकटामध्ये देत होते
आपण किती विद्वान
शिक्षणाचा बाजार मांडून
पिढ्या बरबाद करू शकतो
चांगले झाले स्वातंत्र्य मिळाले
ते जुलमी साले अनाथ मुलांना
भिक मागू देत नव्हते
दरिद्र्यासारखे त्यांच्याकरिता
अनाथाश्रम चालवित होते
आपण किती दयावान
अनाथ मुलांना पांगळे करून
भिक मागावयास लावू शकतो
झकास झाले स्वातंत्र्य मिळाले
ते मिशनरी साले गरिब रूग्णांस
हलाखीत मरू देत नव्हते
ईश्वरसेवा समजून त्यांची
सेवाशुश्रुषा करीत होते
आपण किती करूणावान
डाॅक्टरांचा संप घडवून
रूग्णांचे हाल करू शकतो
ऊत्तम झाले स्वातंत्र्य मिळाले
ते फिरंगी साले आपणाला
लाच खाऊ देत नव्हते
गाढवासारखे लाचखोरांस
बूटांच्या लाथा घालीत होते
आपण किती सचोटीवान
लाचखोरांच्या मिळकतीमध्ये
आपला वाटा ठेववू शकतो
बरे झाले ते इंग्रज गेले
पण जाता जाता साले आपले
देशप्रेमही घेऊन गेले
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
>> Republic Day sms wallpaper
>> Republic Day Speech Essay in Marathi
0 comments