whatsapp status greetings card information essay mahiti abhang
दिगंबरा दिगंबरा..
श्री दत्तगुरु दिगंबरा..
विश्वंभर औदुंबरा..
दयाघना हे करूणाकरा..!!
सकल पालनहारा..
भक्त वत्सल सुखकरा..
अनुसया पुत्रा..
ब्रह्मा विष्णु महेश्वरा..!!
नाथांच्या नाथा..
सिद्ध समर्थ शुभंकारा..
नमितो तुज देवा..
शरण आलो कृपा करा..!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
अनसूयात्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः।
स्मर्तृगामी स्वभक्तानामुद्धर्ता भवसंकटात् ।।
! दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ...!!
श्री गुरुदेव दत्त
स्वामी समर्थ
१. अर्थ
अ. दत्त म्हणजे (निर्गुणाची अनुभूती) दिलेला : दत्त म्हणजे `आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत', अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा. जन्मापासूनच दत्ताला निर्गुणाची अनुभूती होती, तर साधकांना ती यायला कित्येक जन्म साधना करावी लागते. यावरून दत्ताचे महत्त्व लक्षात येईल.
आ. दत्त म्हणजे `चैतन्यदायी लहरींचा दाता' :
`उच्च किंवा कनिष्ठ देव-देवतांच्या सगुण, तसेच निर्गुण लहरी कमी कालावधीत जिवाला प्रदान करणारे व उत्कृष्ट दातृत्वाचे दर्शक असे तत्त्व म्हणजे दत्त. दत्त याचा अर्थच असा आहे, `चैतन्यदायी लहरींचा दाता.\' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.६.२००५, दुपारी २.५४)
दत्ताच्या काही नावांचा भावार्थ
अ. दत्तगुरु (जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी झटणारा) : `दत्त हे तत्त्व जिवाकडून कोणत्याच सगुण-निर्गुण भावाची अपेक्षा न ठेवता जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी झटत असते; म्हणूनच ते सर्व लोकांत `दत्तगुरु' या नावाने ओळखले जाते.
आ. अवधूत (दत्त म्हणजे सगुण व दत्तात्रेय म्हणजे निर्गुण, या दोन रूपांना जोडणारा) : `अवधूत' म्हणजे जिवाच्या देहातील अष्ट अवधाने नियंत्रित करून त्याला सगुणातून निर्गुणाची दिशा दाखवणारा. अवधूत हे दत्त व दत्तात्रेय या दोन रूपांना जोडणारे माध्यम आहे. दत्त (ब्रह्मा, विष्णु व महेश यांचा मूर्त-स्वरूप आविष्कार) हा सगुण, तर दत्तात्रेय (ब्रह्मा, विष्णु व महेश या तत्त्वरूपी त्रयींचा प्रकाशरूपी आविष्कार) हा निर्गुणाशी संबंधित आहे. `अवधूत' हे दत्ताच्या तेजाची प्रभावळ घेऊन जन्माला येणारे तत्त्व आहे.
इ. दिगंबर (मोक्षात विलीन होईपर्यंत साथ देणारा) : `दिगंबर' म्हणजे अंबररूपी व्याप्त प्रकाशात, म्हणजेच मोक्षात विलीन होईपर्यंत, म्हणजेच गंतरात जाईपर्यंत निरंतर साथ देणारे तत्त्व.
ई. श्रीपाद (`श्री' तत्त्वाच्या चरणांपर्यंत नेणारा) : `श्री' म्हणजे ईश्वराचे अविनाशी तत्त्व. अशा ईश्वररूपी अविनाशी तत्त्वाच्या, म्हणजेच `श्री\' तत्त्वाच्या चरणांपर्यंत नेणारे तत्त्व, म्हणजे श्रीपादरूपी दत्ततत्त्व.
उ. वल्लभ (अभय देणारा) : भय निर्माण करणार्या वलयांकित त्रासदायक लहरींपासून ब्रह्मांडाचे रक्षण करून जिवांना अभय देणारे तत्त्व, म्हणजे वल्लभरूपी दत्ततत्त्व.' - एक विद्वान
0 comments