Wednesday 16 September 2015

Ganesh Chaturthi marathi sms message wallpaper wishes quotes essay nibandh mahiti information details गणेश चतुर्थी

Whatsapp status fb shayari lines funny jokes poems

Essay Nibandh mahiti pooja vrat katha Ganesh Utsav, Ganesh festival, Ganeshotsav, Marathi Essay, Cultural Thoughts, Articles

Ganesh Chaturthi marathi sms message wallpaper wishes quotes essay nibandh mahiti information details गणेश चतुर्थी
Ganesh Chaturthi marathi sms message wallpaper wishes quotes essay nibandh mahiti information details गणेश चतुर्थी

Text Marathi Font

 ॥ॐ गं गणपतये नमः॥
गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया

 "सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना
सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. "
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

Greetings Card HD Pics



Information:

गणेश चतुर्थी हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. श्रीगणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते.

त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. आरतीच्या शेवटी देवें म्हणतात व प्रसाद वाटतात.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकारामुळे सुरू झालेला गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून पुढे दहा दिवस साजरा केला जातो. साधारणतः दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन केले जाते.

महत्व

           अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे.दर महिन्याच्या चतुर्थीला गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते,तर गणेशोत्सवामधील दीड दिवसांत ते १००० पटीहून अधिक कार्यरत असते.

संतांनी गौरवलेले दैवत श्री गणेश

           संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वरमाउलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी ‘देवा तूचि गणेश, सकल मती प्रकाशु’, असे म्हणून गणरायाला सविनय वंदिले आहे. संत एकनाथांनी भागवतटीकेत श्री गणेशाला ‘ओम् अनादि आद्या । वेद वेदान्त विद्या । वंद्य ही परमा वंद्या । स्वयंवेद्या श्री गणेशा ।।’ याप्रमाणे वंदन केले आहे. संत नामदेवांनी ‘लंबरोदरा तुझे शुंडादुंड । करीतसे खंड दुश्चिन्हांचा ।।’, असे म्हटले आहे.

प्रथम गणेशपूजन का करतात ?

           गणपति दशदिशांचा स्वामी आहे. दशदिशा म्हणजे अष्टदिशा अधिक ऊध्र्व(वरची) आणि अधर(खालची) अशा दोन दिशा. इतर देवता त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणून कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतिपूजन करतात.

प्राणशक्ति वाढविणारा

              मनुष्याच्या शरीरातील निरनिराळी कार्ये निरनिराळ्या शक्तींद्वारे होत असतात. त्या निरनिराळ्या शक्तींच्या मूलभूत शक्तीला प्राणशक्ति असे म्हणतात. गणपतीचा नामजप हा प्राणशक्ति वाढविणारा आहे.

श्री गणेशाला वक्रतुंड का म्हणतात ?

            सर्वसाधारणत: वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, सोंडेचा असा अर्थ समजला जातो; पण ते चूक आहे. ‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड: ।’ म्हणजे वक्रमार्गाने(वाईट मार्गाने)चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुण्ड.’

पूजेत डाव्या सोंडेचा गणपति का ठेवावा ?

           पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपति ठेवावा. उजव्या सोंडेचा गणपति हा अतिशय शक्तीशाली व जागृत आहे, असे म्हटले जाते.
याउलट डाव्या सोंडेचा गणपति शीतल व अध्यात्माला पूरक असतो, याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.

गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी तयार करण्यात येणारी मूर्ती कशी असावी ?

           पुराणांत गणपती हा मळापासून बनला असल्याचे सांगितले आहे. चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट होण्याचे प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत खूप जास्त असते. तसेच गणेशमूर्ती ही शक्यतो पाटावर बसलेली व हातात पाश अंकुश धारण केलीली असावी. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात गणेशाची शक्ती कार्यरत होऊन पूजकाला अधिक लाभ होतो.

श्री गणपतीला दुर्वा व लाल फुले का वहावित ?

           दुर्वांमध्ये श्रीगणेशाचे तत्त्व जास्तीतजास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे गणपतीला दूर्वा वाहिल्याने मूर्तीत मोठ्या प्रमाणावर गणेशाची शक्ती जास्त प्रमाणात आकृष्ट होऊ मूर्ती जागृत होते. या दूर्वा नेहमी कोवळ्या अन् लहान आकाराच्या एकत्र जुडी करून वाहव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्या. गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणे फार महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे; गणपतीचा वर्ण लाल आहे. पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते व त्यामुळे मूर्ती जागृत व्हायला मदत होते.

मोदक
अ. 'मोद' म्हणजे आनंद व 'क' म्हणजे भाग. मोदक म्हणजे आनंदाचा लहानसा भाग. मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे 'ख' या ब्रह्यरध्रांतील पोकळी सारखा असतो. कुंडलिनी 'ख' पर्यंत पोहोचल्यावर आनंदाची अनुभूती येते. हाती धरलेला मोदक, म्हणजे आनंद प्रदान करणारी शक्ती.
आ. 'मोदक' हे ज्ञानाचे प्रतिक आहे; म्हणून त्याला 'ज्ञानमोदक' असेही म्हणतात. ज्ञान प्रथम थोडे आहे असे वाटते (मोदकाचे टोक हे याचे प्रतीक आहे); पण अभ्यास करू लागल्यावर समजते की, ज्ञान हे फारच मोठे आहे. (मोदकाचा खालचा भाग हे त्याचे प्रतीक आहे.) मोदक गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो.

आरती अन् नामजप

          गणेश चतुर्थीच्या काळात आरती म्हणणे म्हणजे कर्णकर्कश्य आवाजात ती म्हणणे, असे जणू समीकरणच झाले आहे. त्याऐवजी प्रत्यक्ष भगवान श्री गणेशासमारे उभे आरती आपण आरती म्हणत आहोत असा भाव ठेवून भावपूर्ण आणि आर्ततेने आरती म्हटली पाहिजे. तर तिचा लाभ होतो. खूप आरत्या म्हणण्याऐवजी फक्त गणेशाची आरती म्हणावी. त्यानंतर त्या ठिकाणी बसून काही वेळ श्रीगणेशाच नामजप केल्यास अधिक प्रमाणात लाभ मिळतो. गणेश चतुर्थीच्या काळात ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ किंवा  ‘श्री गणेशाय नमः ।’ नामजप जास्तीतजास्त केल्यास गणेशतत्त्वाचा खूप जास्त लाभ होतो.
Load disqus comments

0 comments

Powered by Blogger.
Some images found on internet, whatsapp. Any kind of copyright issues plz contact.
plzinforme@gmail.com

Games

Funny