नशिबावर अवलंबून राहणारे युवक हे इतरांसाठीही घातक ठरतात. ते आपल्या निराशावादी प्रवृत्तीचा जिकडे जातील तिकडे प्रसार करीत असतात. परीक्षा असो वा इंटरव्ह्यू त्यासाठी अभ्यास, नियोजन, कष्ट, आत्मविश्र्वास हा आवश्यक ठरतो. आजच्या स्पर्धेच्या युगात मोठे यश मिळविणे अवघड असले तरी ते अशक्य मात्र नाही.
आजच्या वैज्ञानिक युगात यश व अपयश नशिबाचा खेळ मानणे अंधश्रद्धेचे लक्षण आहे, पण अशा लोकांची कमी नाही. नशिबावर अवलंबून राहण्याने काहीच साध्य होत नाही. यश त्यांनाच मिळते जे ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. यशाबद्दल साशंक असणारा कधी यश मिळवू शकत नाही. चांगल्या व वाईट नशिबाचा खेळ हा लोकांना मागेच ठेवतो. प्रयत्न केला तरी नशीबात असते तरच यश मिळते हा भ्रम चुकीचा आहे. अपयशी माणसे नशिबाच्य आड आपल्या चुका व दोष लपवून ठेवतात. नशिबावर अवलंबून राहणारे युवक हे इतरांसाठीही घातक ठरतात. ते आपल्या निराशावादी प्रवृत्तीचा जिकडे जातील तिकडे प्रसार करीत असतात. परीक्षा असो वा इंटरव्ह्यू त्यासाठी अभ्यास, नियोजन, कष्ट, आत्मविश्र्वास हा आवश्यक ठरतो. आजच्या स्पर्धेच्या युगात मोठे यश मिळविणे अवघड असले तरी ते असंभव मात्र नाही.
मानवाला त्याचे ध्येय व स्वप्ने यासाठी झगडून व सतत प्रयत्न करुनच यश मिळते. अपयश हे आपल्याला शिकवतच असते. कोणत्याही व्यक्तीचे यश हे त्याच्या सर्व प्रयत्नांवरच अवलंबून असते, पण असे प्रयास करुनही जर अपयश पदरी आले तरी त्यामागील कारणे व आपल्यातील कमजोरी, उणिवा जाणून घ्या. त्यावर लक्ष देऊन यशासाठी पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करा. काम सुरु करण्याअगोदर शांत चित्ताने त्यावर नीट विचार करा. आपल्या करिअरमधील ध्येय ठरवताना त्याच्याशी अन्य कोणती मिळतीजुळती कार्यक्षेत्रे आहेत हेही तपासून बघा. यश मिळवण्यासाठी शंकेखोर मनाने प्रयत्न करु नका. प्रत्येक यशाच्या मागे ते मिळविण्यासाठी केले गेलेले इमानदारीचे प्रयत्नच कारणीभूत असतात. यासाठी जरुर तर छोटेमोठे त्यागही करावे लागतात. यश हे एका रात्रीतून मिळत नसते तर वर्षानुवर्षांची तपश्र्चर्या करावी लागते. कष्ट व ध्यास यांना पर्याय नाही. यश मिळेपर्यंत अथक प्रयत्न करा. निराश होऊ नका. सर्वांत आश्र्चर्याची व मोठी गोष्ट तर ही आहे की तुम्ही आणि तुमचे यश यामध्ये नशीब नावाची कोणतीच गोष्ट कधीच येऊ शकत नाही. !
0 comments