सर्व देवतांमध्ये शनिदेवाचे व्यक्तित्व सर्वात वेगळे आहे. शास्त्रानुसार शनी सूर्यपुत्र आहेत.त्यांच्या आईचे नाव छाया आहे. शनिदेवाला न्यायाधीशाचे महत्वपूर्ण पद प्राप्त आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला भलेही क्रूर ग्रह मानले जात असेल, परंतु ते चांगले फळही प्रदान करतात.
शनिदेव सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. शनी एकमात्र असा ग्रह आहे जो एखाद्या राशीमध्ये अडीच वर्ष राहतो. त्यामुळे त्यांना शनेश्चर म्हटले जाते.
शास्त्रानुसार शनिदेव पत्नीच्या शापाने शापित आहेत. एका कथेनुसार शनीची पत्नी एक गंधर्व कन्या असून खूप रागीट स्वभावाची आहे. एकदा शनिदेव ध्यान करीत बसले होते. तेव्हा त्यांची पत्नी तेथे आली परंतु शनिदेव श्रीकृष्णाच्या ध्यानात मग्न होते, त्यामुळे त्यांचे पत्नीकडे लक्ष गेले नाही. या गोष्टीमुळे क्रोधीत झालेल्या त्यांच्या पत्नीने त्यांना शाप दिला की, शनिदेव ज्या व्यक्तीकडे पाहतील तो व्यक्ती नष्ट होईल. तेव्हापासून शनिदेव आपली दृष्टी खाली ठेऊन चालतात कारण काही अनिष्ट घडू नये.
शास्त्रानुसार शनिदेवाला न्यायाधीश मानले जाते. आपले सर्व चांगल्या-वाईट कर्माचे फळ शनिदेव देतात. आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला मिळते. जर एखाद्या व्यक्तीने चुकीचे काम केले तर शनिदेव त्याला दंडित करतात. त्यामुळे त्यांना क्रूर ग्रह मानले जाते.
शास्त्रानुसार शनिदेव गरिबांचे देवता मानले जातात. जो व्यक्ती गरिबांना त्रास देतो त्याला शनिदेव कधीही माफ करीत नाहीत. जो व्यक्ती गरिबांना मदत करतो त्याला शनिदेव शुभफळ प्रदान करतात.
शनिदेवाला तेल अर्पण करतात त्यासंबंधित एक कथा आहे. एकदा शनिदेव आणि हनुमानामध्ये युद्ध झाले. युद्धात शनिदेवाला पराभवाचा सामना करावा लागला. युद्धात शनिदेवाला झालेल्या वेदना कमी करण्यासाठी हनुमाने त्यांना तेल दिले. त्या तेलामुळे शनिदेवाच्या वेदना समाप्त झाल्या. तेव्हापासून शनिदेवाला तेल अर्पण केले जाते.
शनीची साडेसाती सात वर्षांची असते त्यामुळे त्याला साडेसाती म्हणतात. शनी ज्या राशीत राहतो त्या राशीच्या पुढे मागे असेलेल्या राशींवर त्याचा प्रभाव राहतो. एकावेळी शनिदेवाची तीन राशींवर साडेसाती राहते.
ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत. शानिदेवला निळ्या रंगाचे फुल अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात.
0 comments