Saturday, 20 June 2015

idli sambar recipe in marathi language इडली सांबर रेसिपी मराठीमध्ये

idli sambar recipe in marathi language इडली सांबर रेसिपी मराठीमध्ये
idli sambar recipe in marathi language इडली सांबर रेसिपी मराठीमध्ये
साहित्य :-
१)      तीन वाटया तांदूळ
२)      एक वाटी उडीदडाळ
३)      खायचा सोडा पाव चमचा
४)      थोडेसे तेल
५)      तीन चमचे दही
६)      चवीपुरते मीठ .
कृती :-
१)      प्रथम तांदूळ व डाळ धुऊन वेगवेगळे भिजत टाकवे .  सात ते आठ तासानंतर ते मिक्सरमधुन रवाळ वाटून घ्यावे . 
२)      त्यात दही टाकून ते पीठ आंबवून घ्यावे .  नंतर इडली करण्याच्या वेळी त्यात सोडा व मीठ टाकावे व ढवळून घ्यावे .
३)      नंतर इडली पत्राला तेल लावून त्यात प्रत्येक साच्यात थोडे-थोडे पीठ टाकून इडल्या कराव्यात .  सात ते आठ मिनिटे त्याला वाफ आणावी .


सांबार - 
तुरडाळ , टोमॅटो , कांदा , सांबार मसाला , चिंच
चवीप्रमाणे मीठ
लाल मिरचीपावडर - चवीप्रमाणे
फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, २-३ लाल सुक्या मिरच्या.

कृती - डाळ, टोमॅटो, १/२ कांदा कुकरला एकत्र शिजवुन घ्यावा. शिजल्यावर कांदा, टोमॅटो आणि थोडी डाळ मिक्सरमधुन वाटुन घ्यावी. उरलेली डाळ घोटुन त्यात वाटलेले मिश्रण घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि एका जाड बुडच्या पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावे. त्यात मीठ, तिखट, सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालावा. उरलेला कांदा पातळ उभा कापुन उकळत्या सांबारमधे घालावा. सांबार उकळत आले की तेलात जिरे, मोहोरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या घालुन फोडणी करुन त्यात ओतावी. एक उकळी आणुन गॅस बंद करावा.

idli sambar powder recipe how to prepare sambar for idli south indian sambar recipe how to make idli sambar how to make idli sambar in hindi types of idli recipes how to make idli sambhar in hindi how to make delicious sambar
Load disqus comments

0 comments

Powered by Blogger.
Some images found on internet, whatsapp. Any kind of copyright issues plz contact.
plzinforme@gmail.com

Games

Funny