Thursday 15 November 2012

शरीरावरील तीळ

शरीरावरील तीळ चे  महत्व 



तीळ केवळ सौंदर्य खुलवण्यासाठी किंवा रोग सूचक नाहीत, तर तिळांचे माहात्म्य अभ्यासण्याजोगे आहे. शरीरावर जिथे तीळ असतो त्याचे महत्व काय आहे ते जाणून घ्या.
* वरच्या ओठावर तीळ असल्यास ती व्यक्ती कामूक व विलासी प्रवृत्तीची असते. कष्ट नको वाटतात.

* गळ्यावर लालसर तीळ असल्यास तो सौभाग्यासूचक असतो. अशी व्यक्ती त्याच्या संसारात आनंदी असते. बुद्धिमत्ता श्रेष्ठ दर्जाची असते व ही व्यक्ती धार्मिक विचारांची असते.

* हाताच्या तळव्यावर अगदी मधोमध तीळ असल्यास ती व्यक्ती महत्वाकांक्षी असते. त्याची इच्छाशक्ती प्रबळ असते. तो कठीण परिस्थितीतून सहज मार्ग शोधतो.

* हनुवटीवर लालसर तीळसर असल्या, ती व्यक्ती दीर्घायुष्य असते. विरुद्धलिंगी व्यक्ती वश होतात.

* पायाच्या चवड्यावर वा घोटावर तीट असेल तर प्रवास खूप होतो. पायपिट खूप होते.

* डाव्या गालावर तीळ असणारी व्यक्ती गरीबीत जन्मली असली तरी ती सर्व ऐश्र्वर्य भोगते. यांना काही कमी पडत नाही. हस्तेपरहस्ते मदत होत राहते. सुखी-समाधानी आहोत असंच ही व्यक्ती इतरांना सांगत असते.

* पुरुषाच्या उजव्या छातीवर तीळ असल्यास त्याचे कौटुंबिक जीवन सुखाचे असते. डाव्या छातीवर तीळ असल्यास त्या व्यक्तीचे श्रम कधीही वाया जात नाहीत. स्त्रीच्या स्तनांच्या मधोमध तीळ असल्यास ती सौभाग्य संपन्न व साहसी असते.

Secreat of beauty mark or beauty spot .
Load disqus comments

0 comments

Powered by Blogger.
Some images found on internet, whatsapp. Any kind of copyright issues plz contact.
plzinforme@gmail.com

Games

Funny